रावसाहेब दादा पवार यांच्यापासून तीन पिढ्यांचे मैत्रीचे संबंध - प्रकाश धारिवाल
शिरूर : सुदर्शन दरेकर (कार्यकारी संपादक)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूर हवेलीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचार निमित्त शिरूर शहरात भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
सुप्रसिद्ध उद्योगपती शिरूर नगरीचे भूषण प्रकाश धारिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला शहरातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
शिरूर शहराच्या विकासामध्ये धारिवाल कुटुंबीयांचे मोठे योगदान असल्याने शहरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. उद्योगपती प्रकाश धारिवाल व त्यांचा मुलगा आदित्य धारिवाल आज प्रचार यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या प्रचार सभेत प्रकाश धारिवाल यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले की पवार कुटुंबीयांचे आमचे तीन पिढ्यांचे ऋणानुबंध असून आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देत नसून अशोक पवार यांच्या बरोबर असलेल्या जुन्या मैत्रीमुळे मी शिरूर शहरात झालेल्या प्रचार फेरीत सहभागी झालेलो आहे. शिरूर शहराचा विकास करताना आमदार अशोक पवार यांचे नेहमी सहकार्य मिळते शहराच्या वतीने सहकार्याची परतफेड करण्याचे शहरवासीय म्हणून आमचे कर्तव्य समजतो असे प्रसार माध्यमांशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले. अशोक पवार यांनी धारिवाल कुटुंबीयांचे आभार मानले यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिरूर शहरातून मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक पवार यांना मतदान करण्याचे आव्हान यावेळी त्यांनी केले.
शहारातील सर्व आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, व्यापारी वर्ग, डॉक्टर्स, वकील, व्यावसायिक तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या रॅलीला संबोधित करताना प्रकाश धारिवाल यांनी धारिवाल परिवार आणि पवार परिवाराचे तीन पिढ्यांचे संबंध आहेत. याच स्नेहसंबंधातून २००७ पासून पवार परिवार नगरपालिका निवडणुकीत सातत्याने आमच्या बरोबर आहे आणि धारिवाल परिवार देखील २००९ पासून प्रत्येक विधानसभा निवडणुकीत अशोकबापूंच्या पाठीशी उभा आहे,असे आमचे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे मी आणि माझे सर्व सहकारी अशोकबापूंना शिरूर शहरातून मोठे मताधिक्य मिळवून देणार आहोत.
माजी नगराध्यक्षा सौ सुवर्णाताई लोळगे, माजी नगरसेविका रोहिणी बनकर,ज्योती लोखंडे, माजी नगरसेवक संजय देशमुख यांनी देखील शिरूर शहरातून मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाच्या अध्यक्षांनी शिरूर हवेलीच्या विकासासाठी आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.
